लाडक्या बहिणींनो: e-KYC (ई-केवायसी) झाली की नाही? घरबसल्या चेक करा, संपूर्ण़ माहिती पहा Ladki Bahin Yojana E-KYC Check

Ladki Bahin Yojana E-KYC Check : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडित ठेवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य आहे. तुम्ही e-KYC केली आहे की नाही, हे कसे तपासावे आणि जर राहिली असेल तर ती संपूर्ण प्रक्रिया कशी पूर्ण करावी, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्याची सोपी पद्धत

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालीलप्रमाणे टप्पे पाळा:

टप्पा १: e-KYC पोर्टलला भेट द्या

  • संकेतस्थळ: सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: ladakibahin.maharashtra.gov.in
  • बॅनरवर क्लिक करा: मुख्यपृष्ठावर दिलेल्या ई-केवायसी बॅनरवर क्लिक करून फॉर्म उघडा.

टप्पा २: लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण

  • आधार क्रमांक आणि कॅप्चा: फॉर्ममध्ये आपला आधार क्रमांक आणि दिलेला पडताळणी संकेतांक (कॅप्चा कोड) अचूक भरा.
  • OTP पाठवा: ‘आधार प्रमाणीकरणासाठी संमती’ देऊन ‘सेंड ओटीपी’ (Send OTP) बटणावर क्लिक करा.
  • OTP नमूद करा: तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी (OTP) नमूद करून ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
  • केवायसी तपासणी: या टप्प्यात, प्रणालीद्वारे तुमची केवायसी यापूर्वीच पूर्ण झाली आहे की नाही, याची तपासणी केली जाते.
    • पूर्ण असल्यास: स्क्रीनवर तसा संदेश दर्शवला जातो.
    • पूर्ण नसल्यास: आधार क्रमांक योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही, हे तपासले जाते आणि पात्र आढळल्यास पुढील टप्प्यावर जाता येते.

टप्पा ३: कुटुंबातील व्यक्तीचे प्रमाणीकरण (पती/वडील)

  • आधार क्रमांक: पुढील टप्प्यात, लाभार्थ्याला आपल्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि संबंधित कॅप्चा कोड टाकावा लागतो.
  • OTP पाठवा: संमती देऊन ‘सेंड ओटीपी’ बटणावर क्लिक करावे.
  • OTP सबमिट: संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून ‘सबमिट’ करावे.

टप्पा ४: प्रवर्ग निवड आणि घोषणापत्र

  • जात प्रवर्ग: अर्जदाराला स्वतःचा जात प्रवर्ग निवडावा लागतो.
  • महत्त्वाची विधाने: खालील दोन महत्त्वपूर्ण बाबींना संमती देण्यासाठी चेक बॉक्सवर क्लिक करावे लागते:
    1. ‘माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय सेवेत कायम कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक नाही.’
    2. ‘माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.’
  • अंतिम सबमिट: ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ‘सबमिट’ बटण दाबावे.

यशाचा संदेश

सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर, स्क्रीनवर ‘तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे’ असा संदेश प्रदर्शित होतो.

Leave a Comment